अमृतचा अमृतस्पर्श; व्याज परताव्यामुळे तरुण उद्योजकाचा व्यवसाय बहरला

Foto
सिल्लोड, (प्रतिनिधी)  प्रबोधिनी (अमृत) यांच्या वैयक्तिक व्याज परतावा योजनेतून मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे.

कठीण परिस्थितीवर मात करत स्वतःचा व्यवसाय यशस्वीपणे उभा करणाऱ्या सिल्लोड येथील तरुण उद्योजक सनी कुलकर्णी यांना महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्था महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण म्हसोबा गल्ली येथे वास्तव्यास असलेले सनी कुलकर्णी यांना घरची शेती असतानाही शेतीसोबत स्वतंत्र व्यवसाय करण्याची इच्छा होती. मात्र आई वडिलांचे अल्पावधीत निधन झाल्याने त्यांच्यावर मोठे कौटुंबिक आणि आर्थिक संकट ओढावले. 

अशा प्रतिकूल परिस्थितीतही हार न मानता त्यांनी सिल्लोड शहरातील स्वतःच्या तीन पत्र्याच्या जागेत बॅग हाऊस व्यवसाय सुरू करण्याचा निर्धार केला. सुरुवातीला केवळ ५० हजार रुपयांच्या मालखरेदीतून त्यांनी व्यवसायास प्रारंभ केला. काही कालावधीनंतर आर्थिक अडचणी वाढल्याने व्यवसायावर परिणाम होऊ लागला. याच दरम्यान एका उपनयन संस्कार कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांची भेट अमृतचे जिल्हा उपव्यवस्थापक योगेश रोडे यांच्याशी झाली. त्यांनी सनी कुलकर्णी यांना अमृतच्या वैयक्तिक व्याज परतावा योजनेची सविस्तर माहिती दिली.

त्यांच्या मार्गदर्शनानुसार आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर चिखली अर्बन बँक शाखा, सिल्लोड यांच्या माध्यमातून सनी कुलकर्णी यांचे १५ लाख रुपयांचे कर्ज प्रकरण मंजूर झाले. या आर्थिक पाठबळामुळे त्यांनी आपला व्यवसाय अधिक भक्कमपणे उभा केला. तसेच अमृतच्या वैयक्तिक व्याज परतावा योजनेतून त्यांना ४४ हजार ४४७ रुपयांचा थेट लाभ मिळाला. आज ते सक्षमपणे स्वतःचा व्यवसाय चालवत असून आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झाले आहेत.

 याबाबत प्रतिक्रिया देताना सनी कुलकर्णी म्हणाले, अमृत म्हणजे माझ्यासारख्या छोट्या व्यावसायिकासाठी खऱ्या अर्थाने अमृत ठरले आहे. या संस्थेमुळेच आज माझा व्यवसाय सक्षमपणे उभा राहिला आहे. तालुक्यातील सर्व समाजबांधवांनी आणि अमृतच्या लक्षित गटातील नागरिकांनी या योजनांचा लाभ घ्यावा, पक्र असे आवाहन त्यांनी केले. या संपूर्ण प्रक्रियेत सहकार्य करणाऱ्या अमृत संस्थेच्या सर्व कर्मचाऱ्यांचे, जिल्हा व्यवस्थापक अक्षय लंबे आणि जिल्हा उपव्यवस्थापक योगेश रोडे यांचे सनी कुलकर्णी यांनी आभार मानले.